कॉंग्रेसची रणनिती आखण्यास प्रशांत किशोर उत्सुक- अमरिंदर सिंह

नवी दिल्ली : लोकसभेच्या 2022मध्ये होणाऱ्या निबडणुकीसाठी कॉंग्रेसच्या निवडणुकीची रणनिती आखण्यास प्रख्यात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर उत्सुक आहेत, असे पंजाबचे मुख्यमंत्री  अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे.

पुढील मध्यावधी निवडणुकीसाठी कॉंग्रेसची रणनिती आखण्यासंदर्भात कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. किशोर यांची सेवा घेण्याबाबतचा निर्णय सोनिया गांधी यांनी माझ्यावर सोपवला आहे, असे  अमरिंदर सिंह यांनी सांगितले.

पुढील  निवडणुकीत कॉंग्रेसला मदत करण्यात आपल्याला आनंद होईल, असे प्रशांत किशोर म्हणाले, असे  अमरिंदर सिंह यांनी सांगितल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.