मुंबई – सध्या संपूर्ण भारत देशावर कोरोना सारख्या भयानक विषाणूचे सावट पसरले आहे. कोरोना विषाणूचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण आढळलेली अनेक ठिकाणं, इमारती, हॉस्पिटल्स सील करण्यात आली असून त्यांना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये काही सिने कलाकारांच्या सुद्धा इमारतींचा समावेश आहे.
सब टीव्ही वरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील तन्मय वेकारिया अर्थात ‘बाघा’ राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे. त्या इमारतीत 3 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे. राज आर्केड या कांदवली पश्चिम येथील इमारतीत तन्मय राहतो.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे, शिवीन नारंग आणि अशिता धवन या सेलिब्रेटींच्या इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर संबंधित इमारती सील करण्यात आल्या होत्या.