28 रुग्णांचा मृत्यू; 1245 जणांना डिस्चार्ज
पुणे – दिवसभरात 2 हजार 900 करोनाबाधितांची नोंद झाली असून, 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 8 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील एकूण बाधितांची संख्या 2 लाख 35 हजार 394 झाली असून, रविवारी डिस्चार्ज दिलेल्या 1245 रुग्णांचा समावेश करून 2 लाख 07 हजार 817 रुग्णांना घरी सोडले आहे.
ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 22 हजार 524 झाली आहे. त्यातील 519 जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, त्यातील तब्बल 955 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात एकूण मृत रुग्णांची संख्या 5 हजार 53 झाली आहे. महापालिकेने स्वॅब चाचण्या वाढवल्या असून, दिवसभरात खासगी लॅब आणि महापालिकेच्या केंद्रांमध्ये मिळून 12 हजार 929 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर, आजपर्यंत 13 लाख 26 हजार 799 संशयितांच्या चाचण्या शहरात झाल्या आहेत.
बाधित वाढण्याचा वेग 22 टक्क्यांवर
सध्या करोना बाधितांची वाढ 22 टक्के आहे. 30 मार्चपर्यंत बाधितांची संख्या दिवसाला पाच हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या होणाऱ्या टेस्ट आणि त्यातील बाधितांची संख्या यांचा “पॉझिटिव्हिटी रेट’ काढल्यास तो 22 टक्के आहे. बाधित वाढण्याचा वेग असाच कायम राहिला तर, 30 मार्चपर्यंत दररोजची बाधितांची संख्या साडेचार ते पाच हजारांपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.