वंदे भारत मोहिमेतून 6 कोटी 75 लाख जण मायदेशी

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्‍स्प्रेसची महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली – कोविड-19 महामारीदरम्यान भारताने केलेल्या सुटका कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत परदेशातील 6 कोटी 75 लाख लोकांना मायदेशी परत आणले आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री श्री. हरदीप सिंह पुरी यांनी केलेल्या ट्विटरमधे दिली आहे. ही संख्या सतत वाढतच आहे. ही फक्त जगभरात अडकलेल्या आणि त्रासात सापडलेल्या नागरिकांना आणण्यासाठी सुरू केलेली मोहीम नसून त्यायोगे लोकांना समजले की त्यांना संकटकाळी मागे /एकटे टाकले जाणार नाही, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी दिनांक 7 मे पासून भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी या जगातल्या सर्वात मोठ्या मोहीमेला आरंभ केला. आरंभीच्या काळात एअर इंडिया आणि त्याची सहकारी एअर इंडिया एक्‍स्प्रेस यांनी या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर इतर विमान कंपन्यांना ही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले.

हवाई सुटकेबरोबरच नौदलाच्या जहाजांचा देखील भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात उपयोग केला गेला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.