मुंबई : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज 283 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत असलेल्या वेळेत 283 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी दिली.
#राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत २८३ विधानसभा सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी दिली.#PresidentialElections2022 pic.twitter.com/TcZeVx6lbz
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 18, 2022
केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर यांनी कामकाज पाहिले.