- दोन लाखांची रोकड लंपास
देहूगाव – देहूगावजवळील झेंडेमळा येथील सीओडी डेपोजवळील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील साडेअठ्ठावीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड असा 9 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊच्या दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी महेंद्र साहेबराव झेंडे (वय 38, रा. झेंडेमळा, सीओडीजवळ, देहूगाव) यांनी फिर्याद दिली. करोनाच्या महामारी संकटातील देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चोरीची मोठी घटना असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, परिमंडल 2 – चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.