शहरात एकूण 8 हजार 777 बाधित
पुणे – शहरासह दिवसभरात आणखी 268 करोना बाधित सापडले. तर, 207 जणांना घरी सोडण्यात आले. 216 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 53 बाधित व्हेंटिलेटर आहेत. बाधित व्यक्ती उशीर रुग्णालयात दाखल होत असल्यामुळे ही संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरातील बाधितांची एकूण संख्या 8 हजार 777 वर जावून पोहचली असून, त्यातले 5 हजार 782 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 413 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थिती 2 हजार 582 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या खासगी रूग्णालयात एकूण 1 हजार 760, ससून रुग्णालयात 147 आणि अन्य खासगी रूग्णालयात 675 बाधितांवर उपचार सुरू आहेत. बाधित वाढत असल्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींचीही संख्या 7 हजार 522 इतकी झाली आहे.
शहरात सात बाधितांचा मृत्यू…
गेल्या 24 तासांत शहरात करोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील सासवड येथील 82 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. धनकवडी परिसरातील 44 तर गंजपेठेतील 54 वर्षीय व्यक्तीचा काल सायंकाळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोंढवा, हडपसर या परिसरातील तीन बाधितांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यांचा आज सकाळी उपचादरम्यान मृत्यू झाला.