सातारा – जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षात शुक्रवारी 268 जणांना दाखल करण्यात आले. तर 146 जणांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातून शुक्रवारी आठ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 114 झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपर्यंत जिल्ह्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली नव्हती. गुरूवारी दिवसभरात 20 जण पॉझिटिव्ह झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या 201 वर जाऊन पोहचली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 61, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 66, वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 14, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 121, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 6 अशा एकूण 268 जणांना विलगीकरण कक्षात दाखत करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन. सी. सी. एस. कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 4 करोनाबाधित रुग्ण 48 तास लक्षणेविरहित असल्याने त्यांना रायगावयेथील कोविड केअर केंद्रात पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 37, कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 4 व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 36 व रायगाव 4 असे एकूण 81 करोनाबाधित रुग्ण दाखल आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित व्यक्तिंची संख्या 201 झाली आहे. त्यापैकी 90 जण उपचार घेत आहेत. 114 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 53, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 9, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 15 अशा एकूण 111 जणांचे तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 35 जणांचे अशा एकूण 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 87 अशा एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 20 जणांचा करोना रिपोर्ट पॉंझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने दिव्शतक ओलांडले. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता 4 जणांचा पॉंझिटिव्ह रिपोर्ट आला. तर आणखी 16 जण पॉंझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी रात्री 11 वाजता दिली.
या 16 जणांमध्ये मायणी येथील 64 वर्षीय पुरुष, मांजरवाडी येथील 53 वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण, निमसोड येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, गारवडी येथील निकट सहवासातील 21 वर्षीय महिला अशा खटाव तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. भीमनगर (ता. कोरेगाव) येथील 27 वर्षीय युवक, फलटण येथील 63 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, धामणी (ता. पाटण) येथील निकट सहवासातील 72 वर्षीय पुरुष, शामगाव (ता. कराड) येथील निकट सहवासातील 24 वर्षीय पुरुष, वरोशी (ता. जावळी) येथील निकट सहवासातील 52 वर्षीय महिला, गवडी (ता. जावळी) येथील 19 वर्षीय पुरुष आसरे (ता. वाई) येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील रायघर येथील निकट सहवासातील 26 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 24 वर्षीय पुरुष व आसनगाव येथील निकट सहवासातील 36 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.