केडगाव पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम त्वरीत सुरु करा

नगर -केडगाव परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षानपासून पिण्याच्या पाणीसाठी संघर्ष करावा लागला आहे. पाठपुरावा करून केडगावसाठी 92 लाखांची पाईपलानचे कामे मंजूर झाले आहेत. मात्र, रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याचा पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. रखडलेले काम तत्काळ सुरु करा अन्यथा महापालिकेत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरसेवक विजय पठारे यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिला आहे.

पठारे यांनी मायकलवार यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अमोल येवले, मनीष गुगळे, पाणीपुरवठा प्रमुख काकडे उपस्थित होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चणचण भागत आहेत. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे रखडलेले काम तत्काळ सुरु करावे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×