Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस पलटी झाली तेव्हा चालक आणि काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले. हा अपघात इतका भयानक आहे की, मृत प्रवाशांची ओळख पटणे अवघड झाले आहे.
या घटनेनंतर आता सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत लिहिले की, “सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. हि बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. यावेळी त्यांनी खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाबाबत सकारात्मक विचार करण्याची विनंतीही शासनाकडे केली आहे.
सिंदखेडराजा, जि. बुलढाणा परिसरात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटली. या अपघातात काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. हि बातमी अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मृतांना भावपूर्ण…
— Supriya Sule (@supriya_sule) July 1, 2023
नेमका अपघात कसा घडला?
नागपूरहून पुण्याकडे विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस निघाली होती. मध्यरात्री 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकली आणि बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने दरवाजाही तुटला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य झाले, त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. आग लागल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यसााठी आक्रोश केला पण यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या अपघातून 8 जण वाचले, पण आपल्यासमोरच बस पेटलेली असताना आणि प्रवासी होरपळत असताना त्यांच्याकडे प्रवाशांना वाचवण्याची काहीच साधने नसल्याने काही मदत करणे शक्य झाले नाही. त्यात रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होते.