सातारा – जिल्ह्यातील करोनाचा कहर सुरू असताना करोनामुळे बळी जाणऱ्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवत आहे. जिल्ह्यात आणखी 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे एकूण 807 जणांचा बळी गेला आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात प्रतापगंज पेठ येथील 65 वर्षीय महिला, सायगाव ता. जावळी येथील 82 वर्षीय पुरुष, साताऱ्यातील शनिवार पेठेतील 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 56 वर्षीय पुरुष, सोनके येथील 82 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 70 वर्षीय महिला, गोवे येथील 56 वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप येथील 74 वर्षीय पुरुष,
वडूज येथील 68 वर्षीय महिला, फलटणच्या कसबा पेठेतील 65 वर्षीय पुरुष, माणी ता. खटाव येथील 35 वर्षीय महिला, कामाठीपुरा येथील 51 वर्षीय पुरुष, विसापूर येथील 85 वषीय परुष, लाखनगर ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, इकसार ता. वाई येथील 46 वर्षीय महिला, मारुतीनगर पोवई बुध ता. खटाव येथील 61 वर्षीय महिला, देगाव येथील 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गोळेवाडी ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष,
मल्हार पेठ, पाटण येथील 70 वर्षीय महिला, कुरोशी ता. महाबळेश्वर येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकूण 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.