पुणे – सीआयआरटी पुणे येथे परिवहन आयुक्त विवेक भिमणवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.१२) राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासमवेत बैठक पार पडली. बैठकीमध्ये रस्ता सुरक्षा व रस्ते अपघातांचा आढावा घेण्यात आला.
यामध्ये १ डिसेंबर पासून पुणे-मुंबई दृतगती महामार्गावर २४ तास वाहन तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि आयआरबी यांचे समवेत २४ तास गस्त घालण्यात येणार असल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.