सातारा (प्रतिनिधी) – कराड तालुक्यात आणखी १४ रुग्ण करोनाबाधित असल्याचे रिपोर्ट रात्री उशिरा आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात २४ तासांत २५ पाँझिटिव्ह रुग्ण वाढले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ६९ झाली आहे.
याआधी सायंकाळी साताऱ्यात १ तर कराड तालुक्यात २ रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापूर्वी सकाळी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील पाच परिचारिकांसह.आठ जण पाँझिटिव्ह आले होते. कराडमध्ये बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १६ वर्षांच्या मुलीला आणि ३७ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.
साताऱ्यामध्ये मुंबईतून आलेल्या २७ वर्षांच्या युवकाला करोनाची लागण
सकाळी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील ६ महिला कर्मचाऱ्यांसह ८ रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील एक महिला कर्मचारी सातारा येथील रहिवासी आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २५ ने वाढली आहे.