- 25 जणांचा मृत्यू
- 233 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या घटली आहे. आज शहरात नवीन 224 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 233 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच 25 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 5) शहरात 224 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 51 हजार 967 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 25 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 16 व शहराबाहेरील 9 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 6219 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 233 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 809 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5058 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 2007 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1000 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 3007 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात करोनामुळे दोघांचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 5) करोनामुळे 2 महिला रुग्णांचा मृत्यू झाला. तर, करोनामुक्त झालेल्या महिलेला घरी सोडण्यात आले.
करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये औंध आणि कस्तुरबा गांधी वसाहत येथील रहिवाशांचा समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या 58 वर्षीय महिला या हिंजवडी येथील रहिवाशी आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या 22 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 357 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 2 हजार 57 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. 349 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 355 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे.