शिरूर -शहरातील कोविड सेंटरमधून सोमवारी (दि. 6) 26 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यात पाठवले होते. त्यापैकी 4 जण पॉझिटिव्ह तर 22 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
शिरूर शहरातील सय्यद बाबानगर येथील 35 वर्षीय महिला, विठ्ठल नगर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील बाधित महिलेचा 42 वर्षीय पती, तर रामलिंग येथील भूमी अभिलेखमधील 53 वर्षीय पुरुष तर गणेगाव खालसा येथील 56 वर्षीय पुरुष असे चौघे पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शहरा तीन रुग्ण आढळून आल्याने नगरपरिषदेच्या वतीने संबंधित ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असून आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.