पुणे – गेल्या 24 तासांपूर्वी दीडशेखाली आलेली करोनाच्या नव्या बाधितांची संख्या बुधवारी पुन्हा वाढली. दिवसभरात 217 नवीन बाधित सापडले. तर 8 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, शहरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 360 वर पोहचली आहे.
बुधवारी शहरात 2,676 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 7 लाख 61 हजार 399 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 63 हजार 836 बाधित सापडले. शहरात बाधित सापडण्याचे प्रमाण जवळपास 21 टक्के आहे. यातील 1 लाख 54 हजार 865 बाधित बरे होवून घरी गेले आहेत.
शहरातील करोनामुक्तीचे प्रमाण 94.51 टक्के इतके आहे. दिवसभरात 380 बाधित करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांत 4 हजार 611 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 359 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 233 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे.
तर 126 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.