देहूरोड परिसरात 21 मतदान केंद्र

-जिल्हा परिषद मुलांची शाळा क्रमांक एकमध्ये एकूण पाच बूथ
-85 बूथ : “मावळ’चे 82, तर “शिरूर’चे तीन

देहुरोड – देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे 82 आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या तीन बूथचा समावेश आहे. एकूण 21 मतदान केंद्रावर हे 85 बूथ राहतील. मावळ, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत ही मतदान केंद्रे आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 20 मतदार केंद्र आणि 82 बूथ देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. यापैकी 47 बूथ मावळमध्ये, तर 35 बूथ चिंचवड विधानसभा हद्दीतील आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघ व भोसरी विधानसभा मतदारसंघातील एक केंद्र आणि तीन बूथ देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.

मावळ विधानसभा मतदारसंघातील देहूगाव येथे जिल्हा परिषद मुलांची शाळा क्रमांक एकमध्ये एकूण पाच बूथ आहेत. जिल्हा परिषदेच्या माळीनगर शाळेत एकूण तीन, विठ्ठलनगर येथे आठ, देहुरोड येथील सेंट ज्युड हायस्कूल तीन, श्री शिवाजी विद्यालय चार, कॅंटोन्मेंट बोर्ड शाळा मामुर्डी सहा, एम. बी. कॅम्प-महात्मा गांधी प्राथमिक शाळा नऊ, चिंचोली प्राथमिक शाळा चार, सिद्धीविनायक नगरी -कै. संभाजी आवळ व्यायामशाळा दोन, श्रीविहार सोसायटी एक, झेंडेमळा कॅंटोन्मेंट प्राथमिक शाळा एक, मामुर्डी सेंड जॉर्ज हायस्कूल तीन आदी मतदान केंद्रे व बूथचा समावेश आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासनगर, विऱ्हाम शाळा 11, विकासनगर मनपा शाळा चार, किवळे गाव मनपा शाळा दोन, रावेत गाव कै. बबनराव भोंडवे प्राथमिक शाळा सहा, रावेत गाव क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल आठ ही मतदान केंद्रे आणि बूथचा समावेश आहे. याशिवाय शिरूर लोकसभेच्या भोसरी विधानसभा क्षेत्रातील तळवडे गावठाण येथील मनपा शाळेत एकूण तीन बूथ आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.