आई, वडिलांच्या सेवेने पुण्य मिळते- पवार

पिंपरी – आई, वडीलांची सेवा केल्याने जे पुण्य मिळते, ते चारधाम करुनही मिळत नाही. पाश्‍चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेली युवा पिढी आई वडीलांकडे, ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करुन आभासी जीवन जगण्यात मश्‍गूल आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केले. ते पै.मारुतराव दामोदर जमदाडे व अंजनाबाई मारुतराव जमदाडे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात बोलत होते.

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, मारुतराव जमदाडे यांनी कुस्तीवर प्रेम करीत चरितार्थासाठी शेती करीत सायकलवर पिंपरी चिंचवड व पुण्यात दूध, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या मुलांना सुक्षिशित केले आहे. व्यवसाय करीत असतांना जमदाडे कुटुंबियांनी सामाजिक संपर्क देखील उत्तम ठेवला. त्याचा हा सोहळा पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणार असून त्यामुळेच आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

यावेळी ह.भ.प तुकारामआण्णा भूमकर (महाराष्ट्र भुषण, मृदुंगाचार्य), ह.भ.प समाजभूषण शांताराम महाराज निम्हण (सांप्रदायिक क्षेत्र), ह.भ.प पांडूरंगआण्णा दातार (महाराष्ट्र भुषण, मृदूंगाचार्य), पै. आप्पासाहेब खुटवड (कुस्तीक्षेत्र), तुकारामभाऊ गुजर (शिक्षण व सहकार), विजूशेठ पांडूरंग जगताप (उद्योजक), पै. अमोल प्रभाकर बुचडे (हिंद केसरी) यांना अजित पवार यांच्या हस्ते कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नंतर, निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले. ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख, माजी खा. नाना नवले, आ.लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, नगरसेवक राहुल कलाटे, मयूर कलाटे, संदीप कस्पटे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, पीडीसीसी बॅंकेचे संचालक आत्माराम कलाटे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, कन्हैयालाल भुमकर, बबनराव जमदाडे, कांतीशेठ भुमकर, तुकाराम जमदाडे, नाना शिवले, भरतशेठ आल्हाट, राजूशेठ पोपट करपे उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना शिवले आणि आभार अंकुश जमदाडे यांनी मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.