पाच रुपयांत 20 लिटर पाणी

नीरा- येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून वॉर्ड नंबर 3 मध्ये आरो प्लांट बसविण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिकांना पाच रुपयांमध्ये 20 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी सांगितले की, नीरा गावात पुढील काळात प्रत्येक वॉर्डमध्ये एक असेच सहा आरो प्लांट बसवण्यात येणार आहेत. शहरातील पाण्याची समस्या पाहता लोकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात एक असे आरो प्लांट बसविण्यात येणार आहेत. यातील पहिला आरो प्लांट वॉर्ड नंबर 3 मध्ये सुरू झाला आहे. या आरो प्लांटच्या माध्यमातून पाच रुपयांत वीस लिटर पाणी देण्यात येणार आहे. यासाठी पाच रुपयाचा कॉईन मशीनमध्ये टाकताच वीस लिटर पाणी येते. जिल्हा परिषद सदस्य शालिनी पवार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण चव्हाण, शिवाजी पवार, पंचायत समितीचे सदस्य गोरखनाथ माने, सरपंच दिव्या पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, गणपत लकडे, माजी उपसरपंच उत्तम शिंदे, दयानंद चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.