अमिताभ यांच्या घरापुढे निदर्शने

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या विद्यार्थी भारतीम संघटनेच्या तीस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आरेमध्ये मेट्रो कारशेडला पाठींबा दिल्याचे ट्‌विट केल्याने त्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने पोलिसांची पूर्व परवानगी न घेता करण्यात येत होती.

दुपारी अडीचच्या सुमारास विद्यार्थी संघटनेच्या सुमारे 30 कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी तासभर निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हुसकावले. पोलिसांनी 23 कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिस उपअधिक्षक परमजितसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांनी निदर्शनाच्या हेतूची कल्पना दिली होती. आम्ही त्याची परवानगी नाकारली होती. तशी त्यांना नोटीसही बजावण्यात आली होती तरी हे विद्यार्थी जमले. त्यांनी निदर्शने सुरू केली.

यातील 23 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलिस कायद्यातील तरतुदीनुसार अटक करून लगेचच जामीनावर सोडण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी यातील मुलींशी अयोग्य वर्तन केल्याच्या अफवा सोशल मिडियावर पसरल्या. मात्र पोलिस आणि विद्यार्थीनी दोघअंनीही या वृत्ताचे खंडन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here