नारायणगाव बस स्थानकात शिवशाही, शिवनेरी, एशियाड थांबवा

माधवी पोटे ः आगारप्रमुखांना दिले निवेदन

नारायणगाव- शिवशाही, शिवनेरी आणि एशियाड या बसना पुणे-नाशिक व नाशिक-पुणे या प्रवासासाठी नारायणगाव बस स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या नारायणगाव शहर अध्यक्ष ऍड. माधवी पोटे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आगार प्रमुख रामनाथ मगर यांना शशिकला भराडिया, डॉ. रोहिणी विद्वांस, डॉ. अर्चना लाहोटी, डॉ. किशोर पोटे आदी कार्यकर्त्यांनी दिले.

नारायणगाव (ता. जुन्नर) हे पुणे-नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे एसटी बस स्थानक आहे. या स्थानकात पुणे व नाशिक येथे जाण्यासाठी शेकडो प्रवाशी ये-जा करीत असतात; पण महामंडळाने विनावाहक शिवशाही, एशियाड, शिवनेरी या बसना पुणे-नाशिक व नाशिक-पुणे या प्रवासासाठी नारायणगाव येथे थांबा दिला नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी या बस नारायणगाव बसस्थानकात थांबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.