रायगडमध्ये टेम्पो दरीत कोसळून 2 ठार

रायगड – रायगडमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी संध्याकाळी दरीत कोसळला. ही दुर्घटना पोलादपूर तालुक्‍यातील कुडपण धनगरवाडी येथे घडली. यात दोन जण ठार, तर 34 जण गंभीर जखमी झाले आहेत.

तर अन्य 25 जण किरकोळ जखमी झाले अंदाज आहेत. महाड, महाबळेश्वर आणि खेड येथून चार ट्रॅकर्सच्या टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. पोलीस आणि महसूल प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत व बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

हा टेम्पो सातारा येथून कुडपण येथे आला होता. लग्न आटोपून परतत असताना ही दुर्घटना घडली. पाऊस पडत असल्याने रस्ता निसरडा झाला होता. अशातच कुडपण जवळील धनगरवाडी येथील तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टेम्पो सुमारे 150 फुट खोल दरीत कोसळला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.