लंडन – इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यात मॅंचेस्टर सीटीने बलाढ्य चेल्सीचा 3-1 असा पराभव केला. या विजयासह सीटीने 15 सामन्यंतून 29 गुणांची नोंद करत गुणतालिकेत 5 वे स्थान पटकावले. चेल्सी या गुणतालिकेत 17 सामन्यांतून 26 गुण मिळवत 9 वे स्थान प्राप्त केले.
या सामन्यात पहिल्या हाफमध्ये इल्क गुंडमनने 18 व्या मिनिटाला गोल करत सीटीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फिल फोडेनने 21 व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी वाढवली. पहिला हाफ संपण्यापूर्वी केवीन डी ब्रायनने 34 व्या मिनिटाला गोल केला व सीटीला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.
हा सामना एकही गोल न करताच हरणार असे वाटत असतानाच चेल्सीच्या कॅलम हडसनने 92 व्या मिनिटाला गोल केला. मात्र, काही सेकंदांतच हा सामना संपल्याने चेल्सीला पराभव पत्करावा लागला.