बारामती ( प्रतिनिधी) : बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 7 कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आले. बारामतीतील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या ४१८ एवढी झाली आहे. त्यापैकी १८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कातील एकूण १३९ जणांचे नमुने दि (१७) रोजीतपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील चार रुग्ण कोरोना संक्रमित आढळले आहेत.
त्यामध्ये भोई गल्ली येथील एक, सूर्यनगरी येथील एक, महिला हॉस्पिटल शेजारील एक व पाटस रोड येथील एक रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील पंधरे येथील एक, ढाकाळे येथील एक, मसोबावाडी मानाप्पावाडी येथील एक असे तालुक्यातील तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. इंदापूर तालुक्यातील देखील एक रुग्ण आढळून आलेला आहे. बारामतीतील रुग्णसंख्या ४१८ झालेली आहे.