भदोही- हाथरस, बलरामपूरचे बलात्कार प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडतीस आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे युपी सरकारवर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.
भदोही येथे अल्पवयीन दलित मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजूनही बऱ्याच जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांवरून लोकांमध्ये संताप आहे. या मुलीचं डोकं चिरडून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. मात्र बलात्कारानंतर आमच्या मुलीला मारून टाकलं असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
मुलीचं डोकं चिरडून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. मात्र बलात्कारानंतर आमच्या मुलीला मारून टाकलं असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
ही घटना भदोही येथील गोपीगंज कोतवाली परिसरात घडली आहे. याठिकाणी चक्राजाराम तिवारीपूर गावात दुपारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर शौचालयासाठी शेतात गेली होती. पण ती खूप उशीर झाला तरी परतली नाही.
त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला शोधण्यासाठी शेताकडे गेले, तेव्हा रक्ताने माखलेला तिचा मृतदेह त्यांना दिसला. तिच्या डोक्याला जबर प्रहार करण्यात आला होता. आरोपींनी निर्दयपणे तिची हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला, पोलिसांनी घटनास्थळावर तपास सुरू केला.