न्यूयॉर्क – अमेरिकेच्या सेंटर्स फाॅर डिसीज कन्ट्राेल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) देशात चाैथी लाट येईल, असा इशारा दिला आहे. या चाैथ्या लाटेमुळे नवीन रुग्णांची संख्या वाढू शकते. सीडीसी हेड डाॅ. वेलेन्स्की म्हणाले, काेराेनाबद्दलच्या नव्या विश्लेषणानुसार आम्हाला तशा प्रकारचा इशारा मिळाला आहे. अमेरिकेत लाॅकडाऊनमध्ये सवलत दिली. ते म्हणाले, सध्या जास्त सवलत देणे धाेकादायक ठरू शकते. अमेरिकेत दरराेज ५० हजारांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. वेलेन्स्की म्हणाले, गेल्या आठवड्यात एका दिवसात ७० हजार नवे रुग्ण आढळून आले हाेते. ब्रिटनमधील बी १.१.७ व्हेरिएंट अमेरिकेत सर्वाधिक संसर्ग करणारा ठरेल.
ब्राझीलमध्ये काेराेनाच्या नव्या प्रकारामुळे लाेक बाधित हाेण्याचे प्रमाण वाढले. आधी बरे झालेल्यांचाही त्यात समावेश आहे. हा प्रकार बी. १.१.७ व दक्षिण आफ्रिकेतील बी.१.३५१ या पेक्षा वेगळा आहे. संशाेधकांनी त्याचे नाव पी. १ ठेवले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्याचा शाेध लावला हाेता. तीन वेगवेगळ्या संशाेधनांनुसार ब्राझीलमधील मनास शहर उद्ध्वस्त हाेण्यामागे पी.१ या विषाणूच्या प्रकाराची भूमिका राहिली आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या चिनी लसीलादेखील पी.१ निष्क्रिय करून टाकू शकते. पी.१ विषाणू ब्राझीलसह आणखी २४ देशांत पसरला आहे. अमेरिकेतील पाच राज्यांत त्यांचा संसर्ग झाला आहे.