सातारा – जिल्ह्यातील 14 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 1045 वर पोहचली आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला,
कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर सैदापूर येथील 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
पुण्यातील एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच 27 जून रोजी एनसीसीएस यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष गोडोली येथील असल्याचे कळविले होते. परंतु त्याचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
दरम्यान, विविध रुग्णालयांत व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी सोमवारी रात्री दिली. या करोनाबाधित रुग्णांमध्ये 12 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून त्यातील 4 प्रवासी, 10 निकटसहवासातील आणि 5 सारीचे रुग्ण आहेत.
या 19 जणांमध्ये जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय युवक, वय 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, बामणोली तर्फ कुडाळ येथील 46 वर्षीय पुरुष, आखेगणी येथील 16 वर्षीय युवक, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 83 वर्षीय वृध्द व 31 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन क्वॉर्टरमधील 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील 35 वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाही येथील 68 वर्षीय महिला, माण तालुक्यातील खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.