सातारा – विविध रुग्णालयांत व करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 20 नागरिकांचा 10 दिवसानंतर मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. तसेच शेजवलवाडी (ता. पाटण) येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज (ता. कराड) येथील 59 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या शेजवलवाडी (ता. पाटण) येथील 58 वर्षीय पुरुष व वडगाव उंब्रज (ता. कराड) येथील 59 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा काल रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दोघांना 10 दिवसांपूर्वी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे दाखल करण्यात आले होते.
करोनामुक्त झालेल्यांमध्ये कराड तालुक्यातील सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला, तुळसण येथील 54 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे येथील 18 वर्षीय महिला, शिरसवडी येथील 50 वर्षीय महिला, 40, 56 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय बालक, माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष, राजापुरी येथील 31 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका यांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 40, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 52 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 26, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 25, शिरवळ येथील 32, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 19, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 2 व पाटण येथील 4 अशा एकूण 240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एनसीसीएस व कृष्णा मेडिकल कॉलेजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.