#IPL2020 : राहुलची तूफानी शतकी खेळी; बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य

दुबई – सलामीवीर के एल राहुल यांच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर  किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर 207 धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. तत्पूर्वी कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. मात्र, के एल राहुलने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. 

के. एल राहुलने तुफानी खेळी करताना 69 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकरांसह नाबाद 132 धावा पटकावल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 3 बाद  206 धावसंख्येपर्यत मजल मारत बेंगळुरूसमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. राहुल व्यक्तिरित मयंक अग्रवालने 26(20), निकोलस पूरनने 17(18), ग्लेन मॅक्सवेलने 5(6) आणि करून नायरने नाबाद 15(8) धावांची खेळी केली.

बेंगळुरू संघाकडून गोलंदाजीत शिवम दुबेने  3 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 2 विकेट घेतल्या तर युजवेंद्र चहलने 4 षटकांत 25 धावा देत 1 विकेट घेतली. अनुभवी गोलंदाज डेल स्टेनची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने 4 षटकांत 57 धावा दिल्या. नवदीप सैनीने 4 षटकात 37 आणि उमेश यादवने 3 षटकात 35 धावा दिल्या. वाॅशिंगटन सुंदरने 2 षटके टाकत 13 धावा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.