Muslim couple wedding ceremony Newasa| नेवासा येथील गोल्डन फाउंडेशनच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात मुस्लिम समाजातील १३ वधु-वर विवाहबद्ध झाले. या आदर्शवत सामुदायिक विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेवासा येथील नेवासा-नेवासाफाटा रोडवर असलेल्या काझीनगर येथील प्रांगणात मुस्लिम समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नेवासा येथील गोल्डन फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला.
या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे गरजवंत असलेल्या वधू वरांच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी गोल्डन फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून त्यांना व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. इस्लाम धर्माच्या पद्धतीनुसार सदरचा सामुदायिक विवाह सोहळा
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी विवाहबद्ध झालेल्या मुस्लिम समाजातील वधूवरांना गोल्डन फाऊंडेशनच्या वतीने दिवाण, गादी, कपाट, रॅक, खुर्च्या, बाथरूम सेट असे पंचावन्न प्रकारचे भांडे व संसार उपयोगी साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजातील धर्मगुरू सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक व सर्व जबाबदार घटकांनी विशेष प्रयत्न केले.