नवी दिल्ली – अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर १०० फुटी भगवा ध्वज फडकणार आहे. यासाठीच्या परवानगीसंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय पर्यटन मंत्र्यांच्या भेट घेतली.
शिवनेरीवर भगवा ध्वज फडकविण्यासाठी तत्काळ संमती द्यावी, यासाठी प्रसंगी नियमांत बदल करावा, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. कोल्हे यांनी यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी आधीच
मंत्री रेड्डी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र भारतीय पुरातत्व विभागाकडून परवानगी देण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे आज खासदार कोल्हे यांनी आज पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली.