Devendra Fadnavis On Manoj Jarange । गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. कीर्तनकार अजय बारसकर यांनी पत्रकार परिषदा घेत जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतलीय. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बंद दाराआड बैठका घेतल्या आहेत, असा आरोप बारसकर यांनी केला.
दरम्यान, या आरोपांनंतर आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता जरांगे मुंबईच्या दिशेने फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. । Devendra Fadnavis On Manoj Jarange
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या आरोपावर उत्तर देण्यास टाळलं आहे. पुन्हा विचारले असता ते म्हणाले की, “मी ऐकलंच नाही आणि मी कशा कशाला उत्तर देऊ?’ असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. यानंतर ते तातडीने हेलिकाॅप्टरने सातारला रवाना झाले आहेत.
सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय – मनोज जरांगे । Devendra Fadnavis On Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, “सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय.
मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न असल्याचे जरांगे यांनी म्हटले.