chhagan bhujbal on manoj jarange । गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. कीर्तनकार अजय बारसकर यांनी पत्रकार परिषदा घेत जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतलीय. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बंद दाराआड बैठका घेतल्या आहेत, असा आरोप बारसकर यांनी केला.
दरम्यान, या आरोपांनंतर आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.यावेळी ते माध्यमांशी बोलत बोलते होते. त्यानंतर आता जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले असून, मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं आहे. ( chhagan bhujbal on manoj jarange )
दरम्यान,अशातच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले मग आता परत आंदोलनाची गरज काय? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. तसेच रोज उठून आंदोलन करतात लोकांनापण कमदांधा पोट पाणी असते याच्यामुळे लोक कंटाळले आहेत.
जरांगेंबरोबर आजूबाजूला राहणारे लोक त्यांच्या विरुद्ध काही गोष्टी उघडपणे बोलायला लागले आहेत.या गृहस्थाच्या अभ्यास नाही हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. उगीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेखाली बसून शिव्या देणे, संत तुकाराम महाराज, मुख्यमंत्री यांच्याबद्दल काहीही बोलायचे. अशी टीका भुजबळ यांनी यावेळी केली. ( chhagan bhujbal on manoj jarange )
इतर महत्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे सागर बंगल्याकडे रवाना