“अंब्रेला मुव्हमेंट’च्या छत्राखाली हजारो आंदोलक रस्त्यावर
हॉंगकॉंग- हॉंगकॉंग़मधील लोकशाहीवादी अंदोलनाने आज आणखीनच उग्र रुप धारण केले. आंदोलकांनी मोर्चावरील प्रतिबंधात्मक आदेश झुगारून देऊन ठिक्ठिकाणी जाळपोळ सुरू केली. पेट्रोल बॉम्ब फेकून आणि रस्त्यांवर टायर पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. आंदोलकांना नियंत्रणात अणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुर आणि पाण्याचा मारा करावा लागला. पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणत्याही स्वरुपातील निदर्शनांना परवानगी नाकारली आहे. शुक्रवारपासून आतापर्यंत आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
मात्र आज दुपारपासून हजारो आंदोलक काळे टी-शर्ट घालून रस्त्यांवर उतरले. त्यांनी हातांमध्ये रंगीबेरंगी छत्र्याही घेतल्या होत्या आणि लोकशाहीवादी घोषणाबाजीही करायला सुरुवात केली. संध्याकाळपर्यंत या आंदोलकांनी व्यापारी भागातून मोर्चा काढला. त्यापैकी काहींनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि दगडांचा माराही केला.
हॉंगकॉंग विधीमंडळाच्या समोरील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. पोलिसांनी आंदोलकांवर निळ्या रंगाचे स्प्रेही उडवले. आंदोलकांना ओळखता यावे यासाठी ही युक्ती वापरली गेली. जून महिन्यापासून आतापर्यंत 900 जणांना अटक करण्यात आली आहे.
चीनचे नेते कॅरी लाम यंच्य निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी निदर्शने केली. कॅरी लाम यांनीच प्रत्यार्पणाच्या विधेयकाला पाठिंबा दिल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. या विधेयकामुळेच हॉंगकॉंग़मध्ये आंदोलन भडकले आहे.