मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ असं तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सोनालीचा अर्धा चेहरा आणि ती पाठमोरी उभी असल्याचे दिसून येतेय. त्या “वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशाप्रकारची लक्ष वेधणारी ही टॅगलाईन या पोस्टरवर दिसते.
Sonalee Kulkarni in and as #VickyVelingkar… Saurabh Varma directs the #Marathi film… Produced by GSeams, Loki Studios and Dancing Shiva… 6 Dec 2019 release… Poster: pic.twitter.com/mA7US3IrIm
— taran adarsh (@taran_adarsh) September 18, 2019
दरम्यान, हे पोस्टर प्रदर्शित झाल्याची माहिती चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्टिट करत दिली आहे. सौरभ वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात सोनालीची भूमिका मध्यवर्ती आहे. ती विकी वेलिंगर म्हणून दिसणार आहे. विकी ही एका कॉमिक पुस्तकातील व्यक्तीरेखा आहे, आणि तो एक घड्याळ विक्रेता आहे अशी माहिती मिळतेय, त्यामुऴे विकी हा असताना ती सोनाली कशी काय होणार ? ही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.