लोहा : क्वॉरन्टाईन रुग्ण समाजात मिसळत असल्याचे पाहून पोलिसानी त्याना शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
येथील दोन क्वॉरन्टाईन रुग्ण त्यांच्या हातावर शिक्के असतानाही नांदेडमध्ये बिनधास्तपणे संचार करत असल्या गुप्त माहिती गस्तीवर असलेले वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांना मिळाली. त्यांनी लगेच जुमा मोंढा परिसरात असलेल्या मुरमुरा गल्ली भागात दोन क्वारन्टाईन रुग्ण बिनदीक्कतपणे संचार करत होते. ते अनेकांना भेटत होते. हा भयंकार प्रकार पाहून अनेकजण त्यांच्यापासून पळ काढत होते. परंतु त्यांना घेरून ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला बोलावून त्यात टाकून त्यांची रवानगी शासकिय रुग्णालयात दाखल केले.