मुंबईतील 50 टक्के रूग्ण सात वॉर्डमधील
मुंबई : मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सातवर गेली आहे. एकूण रूग्णांपैकी सात वॉर्डमध्ये 50 टक्‍क्‍यांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. परिणामी प्रशासन हायअलर्टवर गेलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्व संवेदनशील भाग सील करण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. आताच्या घडीला मुंबईत बाराशेहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे.

धारावी सारखी लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या ठिकाणी कोरोनाने शिरकाव केल्याने कम्युनिटी स्प्रेडची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, जे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी वेगळी योजना राबवण्यात येत आहे.

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून आताच्या घडीला राज्यात दोन हजारच्या जवळपास कोरोनाची लागण लोकांना झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याने राज्याचे संपूर्ण लक्ष या शहरात लागले आहे. दरम्यान, कोरोना बाधितांच्या संख्येवरुन मुंबईतील विभागांची वर्गवारी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.