‘मोदी म्हणजे जणू हनुमान’; ब्राझीलच्या पंतप्रधानांकडून मोदींचे कौतुक

नवी दिल्ली – करोना व्हायरस जगभरात हाहाकार घालत असून अद्यापही यावर औषध सापडलेले नाही. परंतु, मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन उपयोगी ठरत असल्याने जगभरातून या औषधाची मागणी वाढली आहे. भारताकडे या औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे भारताने शेजारील देशांना मदतीचा हात देत औषधाची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हनुमान जयंतीचे औचित्य साधत मोदी हनुमान असून, त्यांनी जगाला संजीवनी बुटी दिली आहे, असे वर्णन केले आहे.

ब्राझीलचे पंतप्रधान जैअर बोल्सनारो यांनी म्हंटले कि, संजीवनी बूटी आणून हनुमानजींनी भगवान रामाचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे भारताने दिलेली औषधी लोकांचे जीवन वाचवेल, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. तसेच, भारत आणि ब्राझील एकत्र या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असतील.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी बोलून कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्याची मागणी केली होती. अमेरिकेने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताकडून २९ लाख डोस हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन खरेदी केले आहेत. यानंतर आता अमेरिकेकडून भारताला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी 2.9 दशलक्ष डॉलरची मदत केली जाणार आहे. एनिथ जस्टर यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या “युएसएड’ या संस्थेच्या माध्यमातून ही मदत दिली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.