मंचर – करोनासारख्या आजारामुळे अनेक नागरिक उपाशी राहत आहेत. पाच रुपयात मिळणारी मंचर येथील शिवभोजन थाळी लॉकडाऊन संपेपर्यंत कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांच्या माध्यमातून ती रक्कम भरून गरीब गरजूंना मोफत दिली जाईल, अशी माहिती शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली. मंचर येथे रेणुकामाता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचे उद्घाटन शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आणि तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोजन थाळी उप्रकम उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, सरपंच दत्ता गांजाळे आदी उपस्थित होते.
मंचर ःयेथे शिवभोजन थाळी उपक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर.