पुणे : चेन्नई सुपर किंग्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यासह, विक्रमी 9 आयपीएल अंतिम सामने खेळणारा हा एकमेव संघ आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने प्रत्येक यश संपादन केले आहे, जे प्रत्येक संघाचे स्वप्न असतेे. आयपीएल 2021 मध्ये, या संघाने केकेआरचा पराभव करून स्पर्धा जिंकली.
आता आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना त्यांच्या संघात कायम ठेवले आहे. सीएसकेच्या यशामागे त्यांच्या संघ व्यवस्थापनाचा मोठा हात आहे, ज्यांनी त्यांच्या प्रत्येक खेळाडूवर नेहमी विश्वास ठेवला आहे.
या संघाला फारसे बदल करणे आवडत नाही आणि गेल्या हंगामात त्यांनी चषकावर आपले नाव कोरले असल्याने ते आपल्या जुन्या खेळाडूंना पुन्हा एकत्र आणू शकतात. या लेखात, आम्ही अशा 3 खेळाडूंवर प्रकाश टाकणार आहोत, ज्यांना सीएसके यंदाच्या लिलावत पुन्हा एकदा करारबद्ध करु शकते.
फाफ डु प्लेसिस
आयपीएलमधील अनुभवी खेळाडूंचा उल्लेख केला तर त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसचे नाव हमखास असते. डू प्लेसिस अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत आहे आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी नेहमीच संकटमोचक ठरला आहे. गेल्या काही हंगामात, त्याने जबरदस्त योगदान दिले.
गेल्या हंगामात त्याने 600 हून अधिक धावा केल्या. याशिवाय, त्याच्याकडे असलेली क्षेत्ररक्षणाची असामान्य क्षमता त्याला विशेष खेळाडू ठरवते. अशा परिस्थितीत चेन्नई या अनुभवी खेळाडूला यंदाच्या लिलावात पुन्हा करारबद्ध करु शकते.
शार्दुल ठाकूर
आयपीएल 2022 च्या लिलावात भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरवर सर्व संघांची नजर असेल. शार्दुल ठाकूर हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्याकडे निर्णायक क्षणी महत्त्वाच्या विकेट घेण्याची कला आहे. याचबरोबर तो फलंदाजीतही मोठे फटके मारण्यासाठी सक्षम आहे.
गेली काही वर्षे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळल्यामुळे त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. आयपीएल 2021 मध्ये त्याने त्याने 21 बळी घेतले आणि सीएसकेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला. चेन्नई संघाला शार्दुल ठाकूरसारखा खेळाडू गमावायचा नाही आणि त्यामुळेच ते लिलावात शार्दूलला परत घेण्यासाठी ते नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करतील.
दीपक चहर
दीपक चहर गेल्या काही वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसत आहे. पॉवरप्लेदरम्यान बळी घेण्याचे कौैशल्य आणि एक उत्तम सिंग स्विंग गोलंदाज असलेल्या दीपकला चेन्नई त्याला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर त्याने चेन्नई सुपर किंग्जला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.
अलीकडेच, दीपक चहरने भारतासाठीही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजीबरोबर आपले फलंदाजीचे कौशल्यही जगासमोर दाखवले आहे. यंदा सर्व संघांना नव्याने संघबांधनी करायची असल्याने, प्रत्येक संघ एका चांगल्या भारतीय वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहेत आणि अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा दीपक चहरवर असतील. अशा परिस्थितीत चेन्नईचा संघ या चमकत्या तार्याला कुठेही जाऊ द्यायचे नाही आणि त्याला पुन्हा आपल्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल.