केबल टाकण्याच्या नावाखाली रस्ता खराब : बांधकाम विभाग निद्रिस्त
निमसाखर- बारामती- बावडा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर ठेकेदाराकडून रस्त्यावरील साईटपट्टयाच खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. पूर्वी झालेले काम व सध्याही चुकीच्या पध्दतीने सुरु असलेले काम तातडीने थांबवण्याची मागणी करूनही डोळेझाक होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
बीकेबीएन रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपूर्वी दर्जेदार काम झाल्याचे आजही भागातील नागरिक सांगतात. या रस्त्यावर गेले काही महिन्यांपासून ठेकेदारांच्या माध्यमातून केबल टाकण्यासाठी खोदकाम होत आहे. हे खोदकाम होत असताना ठेकेदार रस्त्यावरील साईटपट्ट्यावरच केबलसाठी खोदकाम केले जात आहे. साईडपट्टया उद्ध्वस्त करण्याचे काम ठेकेदाराकडून होत आहे. असे काम यापूर्वी खासगी कंपनीकडून काम झाले होते. सध्या सरकारी कार्यालयांसाठी वेगवान नेटसाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. बेकायदेशीरपणे सुरू असलेले काम मात्र आजी आणि माजी आमदार या रस्त्यावरून ये- जा करीत असतात. याचा प्रवास डोळेझाक सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर गांधारीची पट्टी लावल्याप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना साईडपट्टयाची नासधूस होत असताना दिसत नसल्यामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. या कामात मलीदा प्रवृत्तीमुळेच हे अधिकारी गप्प असल्याची चर्चा होत आहे. बारामती-बावडा रस्त्यावर अनेक छोटे, मोठे अपघात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. मार्गावरील नागरिकांना काही महिन्यांपासून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कंपनीची केबल टाकण्याचे काम संबंधीत ठेकेदाराने थांबवावे, अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केली आहे.