नागरिकांना मास्कचे वाटप
पुणे : करोना पासून बचाव व्हावा या उद्देशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस अतुल मारूती जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुमारे 6 हजार मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात राकेश खरात, अस्लम मोमीन, हनुमंत धनगर, बबलु सय्यद, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.