पुणे : आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्षा अर्चना पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला आघाडीच्या सभासद उपस्थित होत्या.
मंत्री मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून याप्रकरणी त्यांनी स्वत: पुढे येत राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. नगरसेविका स्वाती लोखंडे,आरती कोंढरे, गायत्री खडके, मंगला मंत्री, स्मिता वस्ते, शहर सरचिटणीस कांचन कुंबरे, सोनाली भोसले, प्रियंका गिरी, किरण मंत्री, विनया बहुलीकर, अश्विनी पांडे, ज्योती जवळकर, हर्षदा फरांदे आदी उपस्थित होते.