म्हसवड – करोना संसर्गामुळे म्हसवड परिसरात भयावह परिस्थिती असून ऑक्सिजनअभावी अनेक बाधितांना प्राणांस मुकावे लागत आहे. “आम्ही म्हसवडकर’ एकत्र येऊन परिसरातील बाधितांना उपचार मिळावेत म्हणून धडपडत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी देसाई उद्योग समूहाने म्हसवड कोविड हॉस्पिटलला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भेट म्हणून दिले आहेत. यामुळे करोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.
म्हसवड येथील कोविड हॉस्पिटलला भाजप नेते अनिल देसाई व जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णा देसाई यांनी देसाई उद्योगाच्या माध्यमातून पाच ऑक्सिजन सिलिंडर भेट दिले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, तानाजी काटकर, डॉ. सावंत, जालिंदर खरात, “आम्ही म्हसवडकर’ ग्रुपचे युवराज सूर्यवंशी, राहुल मंगरुळे, कैलास भोरे, डॉ. राजेंद्र मोडासे, डॉ. राजेश शहा, ऍड अभिजित केसकर, प्रशांत दोशी
एल. के. सरतापे, गणेश माने, समीर ओंबासे, अविनाश मासाळ, भागवत जानकर, खंडेराव सावंत, बंटी माने, पिंटू पानसांडे उपस्थित होते. देसाई म्हणाले, करोनाच्या संकटात जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःची काळजी घ्या, म्हणजे समाजाची काळजी घ्याल. हा आजार झाल्यास आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधा. यावेळी “आम्ही म्हसवडकर’ ग्रुपच्यावतीने देसाई यांचा सत्कार करण्यात आला