देऊळगावराज- येथे बुधवारी (दि. 15) भैरवनाथाच्या मंदिरात अवैध दारू विक्री बंद करून कारवाई करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या अध्यक्ष सुभद्रा मुडलिक आणि गावातील इतर 15 महिला उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. अधिकारी यांनी उपस्थित राहून देऊळगावराजे येथील अवैध दारू विक्री व्यावसायिक आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच या महिला संघटनांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दौंड पोलीस स्टेशनला मदत करावी, असे लेखी पत्र दिल्यावर उपोषण सोडण्यात आले.