खोलर्यंत भेगा पडून डोंगावरील जमीन खचली
राजगुरुनगर- आव्हाट (ता. खेड) येथील दरेवस्ती येथील डोंगरावरील जमिनीला मोठ्या आणि खोल पर्यंत भेगा पडुन जमीन खचू लागली आहे. या वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे.
माळीण गावासारखी परिस्थिती या ही गावात निर्माण होते की काय या भीतीच्या सावटाखाली दरेवस्ती येथील सुमारे 7 ते 8 कुटुंब आहेतगावातील इतर ग्रास्थानाचे त्यांच्यावर लक्ष असून त्यांना सुरक्षितथाळी हलवण्याची मागणी होत आहे. या कुटुंबांची शेती याच ठिकाणी असल्याने ते वर्षानुवर्षे येथे वास्तव्यास आहेत. दिवसेंदिवस येथील डोंगरावरील जमिनीच्या भेगा वाढत असून पावसाचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ उपयोजना करण्याची मागणी किरण वाळुंज, मारुती वाळुंज, नामदेव वाळुंज, अंबू वाळुंज, वसंत वाळुंज यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
- पंचनामा करण्याचा तहसीलदारांचा आदेश
भू स्खलन होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार सुचित्रा आमले यांना परिस्थितीची माहिती दिली आहे त्यांनी याभागाचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठी सर्कल यांना दिले आहेत. हा अहवाल भू-संशोधन विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर या भागाचे भूसंशोधन विभागाकडून पाहणी केली जाणार आहे.