बारामती- नांदण्याची इच्छा असताना देखील पत्नीला घटस्फोटाची मागणी करणाऱ्या अभियंत्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात ट्रिपल तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ट्रिपल तलाक कायद्याचा पहिला गुन्ह्याची जिल्ह्यात नोंद झाल्याचे बोलले जात आहे.
शादाब इब्राहिम जमादाररोज (रा. उंड्री, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर मुलीचे वडील राज मोहम्मद अब्दुल शेख (वय 55, रा. शिर्सूफळ, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शादाब सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तर मुलीची नांदण्याची इच्छा असतानादेखील शदाबने एका नोटीसद्वारे पत्नीला तलाक पाठवला आहे. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.