बॉलीवूडमधील सुपरहिट ठरलेल्या “रोबॉट’ चित्रपटाचा सिक्वल असलेला “2.0′ नुकताच चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. यात सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वाधिक बजेट असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.
हा चित्रपट भारतात गतवर्षी 29 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात तो चीनमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणास्तव त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा 6 सप्टेंबरपासून चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून तो तब्बल 48 हजार चित्रपटगृहात दाखविण्यात येत आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा रजनीकांतचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाला चीनी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
“2.0′ हा चित्रपट सायन्स फिक्सन चित्रपट असून याचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले आहे. या चित्रपटात रजनीकांतने एका सायटिस्ट डॉक्टर वशीकरणची भूमिका साकारली आहे. जे सरकारकडून देशावरील येणा-या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील असतात. तर अक्षय कुमारने नेगेटिव्ह भूमिका साकारली आहे. या चित्रपटात वीएफएक्स आणि तंत्रज्ञानचा सर्वोत्कृष्ट वापर करण्यात आला आहे.