आळेफाटा-चाळकवाडी येथील रामवाडी वस्तीमध्ये तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने घराच्या छपरावर उडी मारून पंधरा कोंबड्यांचा फडशा पाडला. त्यानंतर काही वेळातच वाघवस्ती येथे कुत्र्यांच्या पाच लहान पिलांचा फडशा पाडला.
सोमवारी (दि. 12) मध्यरात्रीच्या सुमारास येथील संदीप वसंत डोंगरे यांच्या घरामागे असलेल्या सुबाभळीच्या झाडावर चढून पंधरा कोंबड्यांचा फडशा पाडला. बुधवारी (दि. 14) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा बिबट्या आला व कोंबड्यांची शिकार करण्यासाठी सुबाभळीच्या झाडावर चढला. शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्यानेही घराच्या छतावर उडी घेतली. कोंबड्याची शिकार केली. यानंतर बिबट्या ने आपला मोर्चा वाघवस्तीकडे वळवला. तेथे कुत्र्यांच्या पिलांवर झडप मारून त्यांचाही फडशा पाडला. या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.