महिनाभरात काम सुरु होणार ः अधीक्षक उमेश झेंडे यांची माहिती
राजगुरूनगर-खेड तालुक्यातील सर्व गावांच्या गावठाणाचे विशेष बाब म्हणून ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. महिनाभरात हे काम सुरु केले जाणार आहे. याबाबत गावातील नागरिकांना सूचना माहिती दिली जाणार असून, त्यांच्या माध्यमातून चुन्याने मार्किंग करून ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण केले जाणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक उमेश झेंडे यांनी सांगितले.
राजगुरुनगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शासकीय ध्वजारोहण येथील तहसीलदार कार्यालयात प्रभारी प्रांत अधिकारी समीक्षा चंद्राकार यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर अधिकारी व नागरिक यांच्यात संवाद-बैठक झाली यामध्ये तालुक्यातील विविध समस्या व सूचना नागरिकांनी अधिकारी वर्गाला सांगितल्या. तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भविष्यातील प्रश्न अडचणी आणि नागरिकांमध्ये असलेले तंटे मिटतील. या समन्वय बैठकीत पश्चिम भागात महसूलविभागाची पर्जन्यमापन केंद्र बसवावीत, राजगुरुनगर मधील गणपती विसर्जन करताना सुरक्षित व्यवस्था करावी. मुसळधार पावसामुळे पडलेले खड्डे तत्काळ बुजवावेत आदि प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.